पुणे: तरुणावर अॅसिड हल्ला,आरोपीने गोळ्या झाडून केली आत्महत्या
पुणे (Pune) येथील सदाशिव पेठ येथे एका तरुणावर अॅसिड हल्ला केला असल्याची घटना मंगळवारी (17 एप्रिल) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली.
पुणे (Pune) येथील सदाशिव पेठ येथे एका तरुणावर अॅसिड हल्ला केला असल्याची घटना मंगळवारी (17 एप्रिल) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली. यावेळी तरुणावर करण्यात आलेल्या अॅसिड हल्ल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रोहीत थोरात असे या तरुणाचे नाव आहे. तर सिद्धराम कलशेट्टी असे हल्लेखोराचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा त्याच्या मैत्रीणीसोबत स्वप्नगंधा अपार्टमेंटच्या येथे रात्री 9.30 वाजता बोलत उभा होता. त्यावेळी सिद्धाराम हल्लेखोराने त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. या प्रकरणी रोहीत ह्याला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.(हेही वाचा-ऐन लग्रसोहळ्यात Ex-Boyfriend चे खतरनाक गिफ्ट, प्रेयसीवर केला Acid हल्ला)
हा सर्व प्रकार पोलिसांना कळताच त्यांनीसुद्धा तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपी सिद्धाराम ह्याचा पाठलाग सु्द्धा केला. परंतु आरोपी सिद्धाराम ह्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र अॅसिड हल्ला कोणत्या कारणामुळे झाला आहे हे स्पष्ट झालेले नाही.