Pune Crime: पुण्यातील पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू, गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु

१० ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमधील प्रवाशांच्या सोन्याच्या बांगड्या, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी ७ ऑगस्ट रोजी अटक केले होते.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Pune Crime: पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला. 10 ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमधील प्रवाशांच्या सोन्याच्या बांगड्या, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी 7 ऑगस्ट रोजी अटक केले होते. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केले जाईल. (हेही वाचा- मुंबईमधील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर; BMC-MARD चा मोठा निर्णय, कोलकाता येथे डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध)

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अशोक गायकवाड असं आरोपीचे नाव होते. पुण्यातील विश्रामबाग वाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी अटक केले होते. 10 ऑगस्ट रोजी पोलिस कोठडीत असताना तो बेशुध्द झाला होता त्या पोलिसांनी शासकिय ससून रुग्णालयात दाखल केले परंतु उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली की, गायकवाड आणि मनोहर रमेश माने यांना 7 ऑगस्ट रोजी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने १-ऑगस्टपर्यंत त्यांची कोठडी मंजूर केल्यानंतर दोन्ही आरोपींना विश्रामबाग वाडा पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये हलवण्यात आले.

पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले की, आरोपी गायकवाडचे अचानक भाग हरपले त्यामुळे आम्ही त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. एमआरआय स्कॅन केले त्यानंतर त्याचा डोक्यात रक्ताची गाठी असल्याचे समजले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांची कोणतीही भुमिका नव्हती असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif