Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; खोपोलीजवळ खासगी बस ट्रकला धडकल्याने चालक ठार, 10 जण जखमी
तसेच या अपघातात प्राण गमावलेल्या बस चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खोपोली नगर पालिका रुग्णालयात नेण्यात आला.
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची (Mumbai-Pune Expressway Accident) मालिका सुरूच आहे. दररोजच्या अपघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. रायगड (Raigad) मधील खोपोलीजवळ वैभव ट्रॅव्हल्सच्या (Vaibhav Travels) खासगी बसची ट्रकला धडक बसून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. देवदूत रेस्क्यू टीम, बोरघाट पोलिस स्टेशन, खोपोली पोलिस, डेल्टा फोर्सचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने जखमींना वेळत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींपैकी दहा प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या अपघातात प्राण गमावलेल्या बस चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खोपोली नगर पालिका रुग्णालयात नेण्यात आला. (हेही वाचा -Uttar Pradesh Accident: बरेली-नैनिताल महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक लागल्याने भीषण आग,घटनेत ८ जणांचा मृत्यू)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत -
खोपोली येथे झालेल्या अपघातामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातामुळे घटनास्थळापासून काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी योग्य व्यवस्थापन करून महार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली. (वाचा - Sindhudurg 4 Girls Drowned: देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडाले, 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या वाढत्या वाढीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या महत्त्वाच्या मार्गावर वाढीव सुरक्षा उपायांची निकड आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जखमींवर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.