Mumbai Accident: मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, तीन जण गंभीर जखमी

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने ईस्टन एक्सप्रेस हायवेहून जाणाऱ्या स्विफट डिझायरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरला जावून धडकली

Accident | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Eastern Express Highway) काल रात्री साडे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिन जण जखमी झाले असुन वाहनांचं मोठ नुकसान झालं आहे. मुंबईहून ठाण्याच्या (Thane) दिशेने ईस्टन एक्सप्रेस हायवेहून जाणाऱ्या स्विफट डिझायरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरला आदळली. एवढचं नाही तर गाडी थेट डिव्हाडर तोडून दुसऱ्या बाजूच्या म्हणजे ठाणेहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेंजरोव्हरवर जावून धडकली. यांत रेंजरोव्हर आणि स्विफ्ट डिझायर दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं असुन या अपघातात तिन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

अपघातातील जखमींना उपचारासाठी विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन जखमींवर उपचार सुरु आहे. तरी गेले काही दिवसांपासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेले काही दिवसांत या मार्गावर अनेक अपघात झाल्याचे बगायला मिळत आहे. तरी नागरिकांनी वेग आवरत ड्रायविंग करावी अशा सुचना कायम मुंबई ट्राफिक विभागाकडून करण्यात येतात. (हे ही वाचा:- Mumbai: मुंबईत राबवणार ‘माझी मुंबई - स्वच्छ मुंबई’ अभियान, राज्य सरकारकडून जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन)

 

या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दुभाजक तोडून दुसरीकडे गेलेल्या स्विफ्ट डिझायरचंही नुकसान झालं असून त्यात बसलेले 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तरी काल विकेंड म्हणजेच रविवार असल्याने मुंबईतून उपनगरात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी जखमींवर उपचार सुरु आहेत.