Thane ST Accident: घोडबंदर रोडवर अपघात, अनियंत्रित एसटी बसची मेट्रोच्या खांबेला धडक, 11 जण जखमी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची मेट्रोच्या खांबाला धडल लागली आहे. या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ST Bus (File Image)

Thane ST Accident: ठाण्याच्या (Thane) घोडबंदर रोडवर भीषण अपघात (Accident) झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची मेट्रोच्या खांबाला धडल लागली आहे. या अपघातात 11 प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. (हेही वाचा-  मुंबई मध्ये हार्बर रेल्वे विस्कळीत; नेरूळ स्थानकांत तांत्रिक बिघाड)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री घोडबंदर रोडवर ओवळा सिग्नलजवळ हा अपघात घडला. चालकाचा वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. एसटी बस थेट पिलरला धडक दिली. या धडकेत बसचा समोरील भागाचे भरपूर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत ११ जण जखमी झाल आहे. त्यांना रामानंद आणि टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.

अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी वाहतुक पोलिस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी पोहचले. बसला बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. या अपघातामुळे वाहतुक सेवेवर परिणाम झालेला नाही. एसटी बस अनिंयत्रित झाली होती त्यामुळे त्याची धडक समोर असलेल्या पिलरला धडकली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घोडबंदर रोडवर अलीकडेच एक भीषण अपघात झाला होता. ज्यात ट्रक पलटी झाला होता. या अपघातामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.