Nagpur Accident: नागपूरात भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक तर फ्लायओवरवरुन खालीपडून चौघांचा मृत्यू

अनियंत्रीत कार चालकाने परिसरातील तब्बल दोन दुचाकींना जबर धडक दिली आहे. त्यापैकी एक दुचाकी थेट फ्लायओवरवरुन खाली कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

flyover (Photo Credits: Facebook)

दिवसेनदिवस अपघातांचं प्रमाण वाढत आहेत. हायवेवरील (Highway) अपघात असो वा शहरातील पण भीषण अपघातांचं (Accident) संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून नियामावली (Guidelines) जाहीर करण्यात आली असुनही नागरिक वाहतूक नियमांचं (Traffic Rules) पालन न करता धोका पत्कारतात. पण त्यामुळे अगदीच जीव गमावावा लागू शकतो. नागपूरात (Nagpur) काल संध्याकाळी सक्करदरा (Sakkardara) परिसरात भीषण (Accident) अपघात झालेला आहे. अनियंत्रीत कार चालकाने परिसरातील तब्बल दोन दुचाकींना जबर धडक दिली आहे. त्यापैकी एक दुचाकी थेट फ्लायओवरवरुन (Flyover) खाली कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुचाकीवर एक दामपत्य आणि त्याची दोन चिमुकले मुलं होती. तर याच कारने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी आहे. तरी नागपूरच्या शासकीक रुग्णालयात (Government Medical College Nagpur) त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

 

पोलिसांनी (Police) धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला अटक केली आहे. तरी ताब्यात घेतलेल्या इसमाची ही स्वत:ची गाडी नसून तो कार मालकाचा ड्रायव्हर (Driver) असल्याची माहिती मिळत आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी नागपूर पोलिस (Nagpur Police) करत आहे. हा अपघात नागपूरच्या (Nagpur) सक्करदरा चौकातील (Sakkardara Square Nagpur) फ्लायओवर (Flyover) परिसरात घडला आहे. नागपूरातील (Nagpur) हा वर्दळीच्या ठिकाणापैकी एक असुन काल शहरात गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) पार्श्वभुमिवर मोठी गर्दी होती. तरी वाहतुक विभागाकडून (Traffic Police) विशेष सुचना जारी करण्यात आल्या होत्या. (हे ही वाचा:- Ganapati Visarjan 2022: गणपती विसर्जन करताना एकाच कुटंबातील 10 जणांना विजेचा धक्का; पनवेल येथील घटना)

 

रात्री दहा वाजताच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर (Sakkardara Flyover) अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या (Flyover) खाली म्हणजे सुमारे 70 ते 80 फूट (Feet) उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात एक मोटार सायकलवरुन प्रवास करणाऱ्या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर धडक दिलेल्या दुसऱ्या मोटार सायकलस्वार गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.