Solapur Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Accident: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळ्यात अपघात, पश्चिम बंगाल येथील फोटोग्राफरचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक दुर्घटना घडली आहे. रिंगण सोहळाचा आनंद घेण्यासाठी आणि आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक फोटोग्राफर येतात. या रिंगण सोहळ्यादरम्यान विचित्र अपघात झाला

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Solapur Palkhi Accident: राज्यात ठिकठिकाणी पंढरपूरच्या वारीचा सोहळा साजरा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक दुर्घटना घडली आहे. रिंगण सोहळाचा आनंद घेण्यासाठी आणि आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक फोटोग्राफर येतात. या रिंगण सोहळ्यादरम्यान विचित्र अपघात झाला आणि या अपघातात एक फोटोग्राफर जखमी होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. फोटोग्राफर पश्चिम बंगालमधील येथून आला होता. कल्याण चट्टोपाध्याय असं अपघातात मृत झालेल्या फोटोग्राफरचा नाव आहे. (हेही वाचा- मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, चार जण जागीच ठार, दोन जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यादरम्यान एक अपघात घडला. या अपघातात पश्चिम बंगाल येथून आलेल्या फोटोग्राफरने आपला जीव गमावला. रिंगण सुरु असताना एका घोड्याच्या गळ्यातील पट्ट्यात पुढील घोड्याचा पाय अडकला आणि तो घोडा रिंगणासमोर खाली बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला. या अपघातात अनेक वारकरी आणि भक्तांमध्ये बसलेला फोटोग्राफर जखमी झाला.

जखमींना प्रथमोपच्चार देण्यात आले. परंतु फोटोग्राफर कल्याण हे गंभीर जखमी झाले. तो बेशुध्द पडल्याने त्याला अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथ उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.