Pune Bribe: पुण्यामध्ये ट्रॅव्हल एजंटकडून लाच मागितल्या प्रकरणी वाहतूक पोलिस हवालदाराला एसीबीकडून अटक

या प्रकरणातील फिर्यादी हा ट्रॅव्हल एजन्सी चालक असून तो पुणे ते सोलापूर दरम्यान इतर ठिकाणी बस चालवतो.

Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

राज्य लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) च्या पुणे युनिटने ट्रॅव्हल एजंटकडून (Travel Agent) पुण्याकडे (Pune) जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी मासिक लाच मागितल्या प्रकरणी एका वाहतूक पोलिस हवालदाराला (Traffic police constable) अटक केली आहे. सुहास भास्कर हजारे असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव असून तो सध्या पुणे शहराच्या हद्दीतील लोणी काळभोर वाहतूक विभागात (Kalbhor Transport Department) कार्यरत आहे. या प्रकरणातील फिर्यादी हा ट्रॅव्हल एजन्सी चालक असून तो पुणे ते सोलापूर दरम्यान इतर ठिकाणी बस चालवतो. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हजारे यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या बसेसवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी मासिक 6,000 रुपयांची लाच मागितली.

सीबीच्या पथकाने शुक्रवारी लाचेच्या मागणीची पडताळणी केली आणि शनिवारी लोणी काळभोर टोल नाक्यावर सापळा रचला. दरम्यान, लाचेच्या रकमेची 5 हजार रुपयांची बोलणी झाली. शनिवारी हजारे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात हजारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा  Narayan Rane’s Security: मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय गृह खात्याकडून ‘Z’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था

सांगवी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षकाला एसीबीने एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. चौकशी होईपर्यंत दोघांना सक्रिय कर्तव्यावरून निलंबित करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.