Contraceptive Ineffective In Mumbai: काहींचे कंडोम फाटले, कोणाकडे गर्भनिरोधक अकार्यक्षम ; मुंबई शहरात गर्भपाताची संख्या वाढली
खास करुन वय वर्षे 30 ते 34 वयोगटातील महिला आणि तरुणींमध्ये गर्भपात अधिक प्रमाणावर होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुंबई महापालिका आरोग्य (BMC) विभागाकडे मागवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.
मुंबई (Mumbai) शहरात पाठिमागील काही काळापासून गर्भपाताचे (Abortion) प्रमाण वाढले आहे. खास करुन वय वर्षे 30 ते 34 वयोगटातील महिला आणि तरुणींमध्ये गर्भपात अधिक प्रमाणावर होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुंबई महापालिका आरोग्य (BMC) विभागाकडे मागवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे गर्भनिरोधक कुचकामी (Contraceptive Ineffective In Mumbai) ठरत असल्याने गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढते आहे. अनेकदा शरीरसंबंधावेळी कंडोम फाटणे आणि इतरही अनेक कारणांमुळे महिलांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. एका आकडेवारीनुसार, मुंबई महापालिका हद्दीमध्ये पाठिमागच्या तीन वर्षांमध्ये तब्बल 67,636 गर्भपात झाले आहेत. खास करुन 30 ते 34 वयोगटामध्ये हे प्रमाण विशेषत्वाने आढळून आले आहे.
नको असलेल्या गर्भधारणेची कारणे
असुरक्षीत लैंगिक संबंध, गर्भनिरोधकाचा वापर टाळणे, अनावधानाने गर्भधारणा होणे, याशिवाय विवाहापूर्वी आलेल्या आणि नको असलेल्या शरीरसंबंध ही गर्भधारणेची कारणे मानली जातात. मात्र, अलिकडील काळात गर्भनिरोधक साधनेही कुचकामी ठरत असल्याचे पुढे आले आहे. 'लोकसत्ता' या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पाठिमागील तीन वर्षांमध्ये मुंबई शहरात 78,199 महिलांचे गर्भपात झाले. त्यातील 67,636 गर्भपात झालेल्या महिला 30 ते 34 वयोगटातील होत्या. धक्कादायक म्हणजे हे गर्भपात गर्भनिरोधक कुचकामी ठरल्याने केले गेले. (हेही वाचा, Right to Abortion: गर्भपात हा महिलांना घटनात्मक अधिकार देणारा France ठरला जगातला पहिला देश! )
गर्भपात करणाऱ्या महिलांच्या संख्येत वयोगटानुसार बदल
माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तात नवभारत टाईम्सने म्हटले आहे की, बीएमसीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकड्यानुसार सन 2023-24 मध्ये 25,835 महिलांनी गर्भपात केला. वय वर्षे 25 ते 29 या वयोगटातील गर्भपात करणाऱ्या महिलांचे प्रमाण 7,606 तर 35 ते 39 वयोगटातील 4,802 महिलांनी गर्भपात केला. वयवर्षे 20 ते 24 या गटातील जवळपास 3,669 महिलांनी गर्भपात केला. (हेही वाचा, Karnataka Abortion Racket: कर्नाटकमध्ये तब्बल 3000 स्त्रीभ्रूण हत्या; गर्भपात रॅकेट तपासात झाले धक्कादायक खुलासे)
सुरक्षीत लैंगिक संबंधाकडे तरुणाईचे दुर्लक्ष
महापालिका अधिकाऱ्यांन मीडिया आउटलेटशी बोलताना सांगितले की, अनेकदा तरुणाई सुरक्षीत लैंगिक संबंधांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे इंजेक्शन, कंडोम, कॉपर टी आदी बाबींचा वापर केला जात नाही. अनेकदा लैंगिक संबंधांवेळी कंडोम फाटण्याच्या घटनाही घडतात. काही प्रकरणांमध्ये सुरक्षीततेची पूर्ण काळजी घेऊनही गर्भधारणेच्या घटना घडतात. त्यामुळेही गर्भपात केला जातो.
गर्भपात करणे नाही सोपे
गर्भपात म्हणजे नको असलेल्या अपत्यप्राप्ती अधवा बाळंतपणापासून सुटका. कधीकधी याला 'गर्भधारणा समाप्ती' असे म्हणतात. वरवर पाहता गर्भपात ही एक वैद्यकीय प्रक्रिया वाटत असली तरी ती तितकी सहज सोपी नाही. गर्भपात करण्यासाठी विशेष कायदा आहे. या कायद्याला अनुसरुन विशिष्ट प्रसंग, परिस्थिती यांचा आधार असेल तरच गर्भपात करता येतो. गर्भपात करताना गर्भाचे वय (कालावधी) देखील विचारात घ्यावा लागतो. अन्यथा डॉक्टर आणि गर्भपात करणारी व्यक्ती आणि जबाबदार लोकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागते.