Abdul Sattar on Radhakrishna Vikhe Patil: छाती फोडून पाहा राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील- अब्दुल सत्तार
त्यामुळे सत्ताबदलाचे वारे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ओळखले आहे का? अशीच चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राज्यात सुरु असलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना बळकटी मिळावे असे पूरक विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. हनुमाना प्रमाणे माझी छाती फोडून पाहिले तर तुम्हाला राधाकृष्ण विखे पाटील दिसतील, असे विधान सत्तार यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या जोडीला उभे राहून प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे सत्ताबदलाचे वारे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ओळखले आहे का? अशीच चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना सत्तार म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्रीच काय पण त्याहीपेक्षा मोठे नेते व्हावे. मित्र मोठा झालेले कोणाला आवडणार नाही? पण सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे अडचणीत आणतील असे प्रश्न आपण विचारु नयेत, असेही सत्तार म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत असे आपणास वाटते का? असे प्रसारमाध्यमांनी खोदून विचारले असता, 'मी हनुमान असतो तर छाती फोडून दाखवले असते की, माझ्या हृदयात राधाकृष्ण विखे पाटील आहेत. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महसूलमंत्री पदासारखे चांगले खाते त्यांना दिले आहे आणि विखे पाटीलही त्या पदाला न्याय देत आहेत', असे सत्तार म्हणाले. एकानथ शिंदे आणि राधाकृष्ण विके पाटील दोघेही मराठा नेते आहेत आणि ते माझ्या हृदयात असल्याची पुस्तीही सत्तार यांनी जोडली.
व्हिडिओ
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूलमंत्री पदाची जबाबदारी आल्यापासून अनेक बदल अत्याधुनिक पद्धतीने होत आहेत. हे बदल मी प्रत्यक्ष पाहात आहे. ते महसूलमंत्री पदावर आल्यापासून शेती आणि इतर क्षेत्रातही चांगली प्रगती होत आहे. त्यामुळे आपला मित्र मोठा झाल्याचे कोणाला आवडणार नाही. त्यांनी असेच पुढे जावे, असे सत्तार म्हणाले.