Pune Kidnapping Video: भरदिवसा पत्नीचे केले अपहरण, पुण्यातील वाकड येथील घटना
चोरी, मारामारी, अपहरण सारख्या घटना वाढत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.
Pune Kidnapping Video: पुण्यात नेमंक चाललं तरी काय? गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. चोरी, मारामारी, अपहरण सारख्या घटना वाढत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये एका महिलेचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.( हेही वाचा- बायकोचे अपहरण करुन दिली भूल, वाहनात ठेवले डांबून; पती आणि सासूविरोधात पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण एका महिलेला बळजबरीने ओढून कारमध्ये घेऊन जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा तपास सुरु केला. जेव्हा व्हिडिओ तपासला तेव्हा असं आढळून आले की, महिलेला ओढून नेणारा व्यक्ती तिचा नवरा आहे. महिला कौटुंबिक वादामुळे घर सोडून गेली होती. पत्नीला परत घेण्याचा प्रयत्न करत होता.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी अशी माहिती दिली की, पीडित महिला आणि तिच्या पतीचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. ७ - ८ दिवसांनी दोघांंमध्ये भांडण सुरु झाले. भांडणाला कंटाळून पीडित महिला पुण्यात मामाकडे राहायला गेली. महिलेला आई वडिल नाहीत. त्यामुळे ती नातेवाईक मध्यस्थी करत होते. दोघांमध्ये सतत भांडण होते. पतीलापासून दूर राहण्यासाठी ती वाकड येथे राहत होती.
ती वाडक येथे नोकरी करत होती. येथे पेइंग गेस्ट निवास पीजी निवासमध्ये राहत होती. दरम्यान ती कुठे राहते हे तिच्या पतीला कळळे. त्यानंतर तिला घेऊन जाण्यासाठी वाकड येथे आला. तीला समजावून घरी घेऊन जाणार होता. पण तीने जाण्यास नकार दिला. याच गोष्टीचा तिच्या नवऱ्याला राग आला आणि त्याने जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महिलेने सासऱ्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला.