Pimpri Chinchwad Crime: बायकोचे अपहरण करुन दिली भूल, वाहनात ठेवले डांबून; पती आणि सासूविरोधात पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल

मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये या दोघांचं लग्न झालं. मात्र आठवडाभरात पती सुमितने नको त्या मागण्या सुरू केल्या. यानंतर महिलेने नवऱ्यापासून वेगळे होत मुंबई गाठली.

Pimpri Chinchwad Crime: बायकोचे अपहरण करुन दिली भूल, वाहनात ठेवले डांबून; पती आणि सासूविरोधात पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल
Kidnaping | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad)  एका विवाहित महिलेचं भरदिवसा अपहरण करण्यात आलं. ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेण्यात आलं. दोन दिवस तिला वारंवार भुलीचं इंजेक्शन देत, गाडीतचं डांबून ठेवण्यात आलं. कशीबशी तिनं स्वतःची सुटका केली अन् वाकड पोलीस स्टेशन (Wakad Police Station) गाठलं.  सुमित शहाणे असं या पतीचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.   (हेही वाचा  - Jalgaon Rape Case: सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना)

मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये या दोघांचं लग्न झालं. मात्र आठवडाभरात पती सुमितने नको त्या मागण्या सुरू केल्या. यानंतर महिलेने नवऱ्यापासून वेगळे होत मुंबई गाठली. काही दिवस मुंबईत काम केल्यावर या महिलेने पिंपरी चिंचवड या ठिकाणी एक नोकरी जॉईन केली. याचा सुगावा सुमितला लागला अन् त्यानं पत्नीच्या ऑफिसचा पत्ता काढला. 19 जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये आला. दुपारी साडे तीनच्या सुमारास पत्नीला फरपटत गाडीत बसवलं.

प्रवासात सुमितने पत्नीला भुलीच इंजेक्शन दिलं. थेट घरी न जाता गाडीतच डांबून ठेवलं.  या दरम्यान ती शुद्धीवर आली की तो वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा,  असा आरोप पत्नीने केलाय.  20 जूनच्या दुपारी तिने सुमितला विश्वासात घेतलं, तो सांगतोय त्या कागदपत्रांवर सही करते, असं ती म्हणाली. मग सुमितने गाडी मंचर परिसरात आणली, मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही, असा बहाणा तिने केला, मग ते मंदिरात थांबून राहिले. त्यावेळी पत्नीने एका तरुणास खुनवत, मदतीची मागणी केली. त्या तरुणाला ही काहीतरी गडबड असल्याचं समजलं, मग तिथं मंचर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस मंदिरात पोहचले अन पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली.

पती, आई आणि चालकावर अनेक आरोप आहेत. आज सकाळी पत्नीने वाकड पोलीस स्टेशन गाठलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).