Aarey Protest: शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी पोलिसांच्या ताब्यात; आरे कॉलनी परिसरात संचारबंदी लागू
आज सकाळी शिवसेना प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरे कॉलनीमध्ये मुंबई मेट्रो प्रोजेक्टसाठी सुमारे 2700 झाडांची कत्तल करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता पर्यावरणप्रेमी आणि प्रशासनामधील संघर्ष वाढला आहे. काल रात्री पासून शेकडो झाडांची तोड करण्यास सुरूवात झाल्यानंतर आक्रमक आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरूवात झाली. आज सकाळी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वृक्षतोडीच्या मेट्रो प्रोजेक्टच्या प्रशासनाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील आपली नारजी व्यक्त केली आहे.
आज (5 ऑक्टोबर) सकाळी आरे कॉलनी परिसरात आंदोलकांना दूर ठेवण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आरे कॉलनी परिसरात वाहनांनादेखील रोखण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करण्यात आले आहे. आरे जंगल नाही या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून शिवसेनेची सरकारवर टीका; संजय राऊत यांनी शेअर केलं व्यंगचित्र.
ANI Tweet
मुंबई वृक्ष प्राधिकरणाने मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरेमधील 2700 झाडे तोडण्याच्या निर्णयालादिला. या निर्णयावर आक्षेप घेत पर्यावरण प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. 4 ऑक्टोबरला न्यायालयाकडून 'आरे बचाव प्रकरणी' या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मेट्रोचं कारशेड आरेमध्ये बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'आरे हे जंगल नाही' असं म्हणत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडून निर्णय देण्यात आला आहे.