Aaditya Thackeray: 'आगोदर आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले आहे', आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर तीव्र टीका

त्यांचे प्रेम राज्यावर नाहीच. आगोदर आमदार पाठवले, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले, अशा शब्दात आदित्य (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज पार पडणारी बैठक रद्द झाली. त्यावरुन राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्रिमंडळ गुजरात विधानसभा निवडणुकीत व्यग्र आहेत. गुजरात निवडणुकीसाठी आजची मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली. त्यांचे प्रेम राज्यावर नाहीच. आगोदर आमदार पाठवले, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले, अशा शब्दात आदित्य (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

सत्ताधाऱ्यांकडून केलेल्या जाणाऱ्या आरोप आणि वक्तव्यांबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, ते जे करत आहेत ती चिखलफेक आहे. त्या चिखलफेकीत मला जायचेच नाही. राज्याच्या विकासावर काही बोलायचे असेल तर बोला. मी त्याला उत्तरे देईन. ज्यांचे राज्यावर प्रेमच नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आजचा बिहार दौरा हा केवळ तरुण नेत्यांमधील संवाद असणार आहे. मी आणि तेजस्वी यादव समान वयाचे तरुण आहोत. बिहारमध्ये ते चांगले काम करत आहेत. त्यामुळे विकास आणि इतर गोष्टींवर आम्ही चर्चा करु. आजवर फोनद्वारे आमची चर्चा होत असे आता प्रत्यक्षात भेट होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. या भेटीत कोणताही राजकीय विषय नसेल असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Senecha Yuvraj Song: 'अन्यायाने पेटून उठतो सेनेचे युवराज'... Aaditya Thackeray च्या नव्या आक्रमक अंदाजावर खास गाणं लॉन्च (Watch Video))

दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि प्रादेशिक पक्ष यांची एखादी राष्ट्रीय आघाडी करण्याचा विचार आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, लगेचच राष्ट्रीय आघाडीव वैगेरे असा काही विषय नाही. हा खूप मोठा विषय आहे. त्यावर आमचे मोठे नेते बोलतील. आज मी केवळ तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी निघालो आहे. ते छान काम करत आहेत. आमच्या विकासकामाबद्दलच चर्चा होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.