Aaditya Thackeray यांच्याकडून मुंबईतील कोरोनापरिस्थितीबाबत आढावा बैठक; 31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर निर्बंध कायम

महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला आदित्य ठाकरेंनी सध्या मुंबईकरांना दिला आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (29 डिसेंबर) बीएमसी कार्यालयामध्ये शहरातील वाढत्या कोरोनारूग्णांची संख्या पाहता एक आढावा बैठक घेतली आहे. त्याला महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) उपस्थित होते. या बैठकीनंतर मीडीयाशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सध्या फेस्टिव्ह मूड असला तरीही 1 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर निर्बंध कायम असतील. कोणी नियम मोडल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सारे सीसीटीव्ही फूटेज तपासून कारवाई करण्याचे आदेश कायम असतील असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान शाळा, कॉलेज बंद करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काही ट्रिगर पॉंईंट सेट करण्यात आले आहेत. त्याच्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, डॉक्टर किंवा पालकांकडून माहिती आलेली नाही. पण राज्य सरकार टास्क फोर्स सोबत बोलून वेळोवेळी योग्य निर्णय घेतील असे म्हटलं आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोविड निर्बंध कडक करण्याबाबत योग्य वेळी टास्क फोर्स सोबत बोलून मुख्यमंत्री निर्णय घेतील असे म्हटलं आहे.

मुंबई मध्ये 54 हजार बेड्स रिक्त आहेत. सध्या रूग्णसंख्या वाढती असली तरीही हॉस्पिटलायझेशन कमी आहे असे म्हटलं आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंट बाबत केवळ व्हॉट्सअ‍ॅप वर फॉरवर्ड होणार्‍या मेसेजेस विश्वास ठेवून निर्णय घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून, तज्ञांकडून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या बाबींवर विश्वास ठेवण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे. हे देखील वाचा: Goa मध्ये 31 डिसेंबरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट किंवा डबल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट बंधनकारक; CM Pramod Sawant यांची माहिती .

मास्क नीट घाला, कापडी मास्क असल्यास डबल मास्क वापरा आणि कोविड 19 चे दोन्ही डोस घ्या. असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे. शक्य असल्यास अनावश्यक गर्दी टाळा. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.