Aaditya Thackeray Car Attack:औरंगाबाद शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कसूर झाल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप; पोलिस महासंचालकांना पत्र
काल संध्याकाळी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगांव मध्ये ग्राम सचिवालय समोरील मैदानात जाहीर सभा सुरू असताना अज्ञातांकडून दगडफेक झाली.
शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्यावर निघालेल्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या ताफ्यावर काल ( 7 फेब्रुवारी) रात्री दगडफेक झाल्याचा प्रकार समोर झाला आहे. औरंगाबाद (Aurangabad) मध्ये जात असताना काल हा प्रकार घडला आहे. आदित्य ठाकरेंसोबत विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) देखील सोबत होते. आज त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कसूर झाल्याचा आरोप करत याप्रकरणी त्यांनी लक्ष घालण्याची देखील विनंती केली आहे.
आदित्य ठाकरेंचा सध्या शिवसंवाद दौरा सुरू आहे. काल संध्याकाळी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगांव मध्ये ग्राम सचिवालय समोरील मैदानात जाहीर सभा सुरू असताना अज्ञातांकडून दगडफेक झाली. सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव आला. हा आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेमधील अक्षम्य कसूर आहे. त्याची नोंद घेण्याचं आवाहन अंबादास दानवे यांनी केले आहे. Stones Pelted on Aaditya Thackeray's Car: आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद मध्ये किरकोळ दगडफेक (See Photos) .
पहा ट्वीट
वैजापूर मध्ये नेमकं काय घडलं?
आदित्य ठाकरे यांची वैजापूर मधील महालगावामध्ये सभा सुरू होती. काहींनी त्या सभेमध्ये गोंधळ घातला. चंद्रकांत खैरे देखील बोलताना दगडफेकीचा प्रयत्न झाला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी स्टेजवरून बोलण्याऐवजी खालूनच सभेला संबोधित केले. दरम्यान काल रमाई जयंती होती. त्यासाठी डीजे लावण्यात आले होते ते बंद केल्याने रागाच्या भरात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आला. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली. यावेळी मिरवणूक थांबवून आदित्य ठाकरेंची सभा सुरू झाल्याने दगडफेक झाली. पुढे गाडीसमोरही राडा घालण्यात आला. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.