IPL Auction 2025 Live

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा केला प्रयत्न

तसेच आत्महत्येदरम्यान फसबुक लाईव्ह (Facebook Live) करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र औरंगबाद पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

Maratha Reservation | (Photo credits: File Photo)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आतापर्यंत अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच आता औरंगाबादमध्ये एका तरुणाने देखील याच कारणासाठी आत्महत्येची बातमी समोर आली आहे. औरंगाबाद (Aurangabad) मधील क्रांती चौकात ही घटना घडली आहे. या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आत्महत्येदरम्यान फसबुक लाईव्ह (Facebook Live) करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र औरंगबाद पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. या तरुणाला रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील क्रांती चौकात फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दत्ता भोकरे असं विष प्राशन केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.हेदेखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणी आता 5 फेब्रुवारीला

यावेळी औरंगाबाद पोलिसांना या घटनेची बातमी मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिस या प्रकरणा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान 25 जानेवारीला मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी आज झाली. मात्र आज न्यायालयात विशेष काहीच घडलेलं नाही. न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली. मात्र कोणताही निर्णय दिला नाही. याबाबतीत दोन आठवड्यांनी सुनावणी घेतली जाईल असे सांगितले.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकणाची सुनावणी व्हर्च्युअल पद्धतीने न होता प्रत्यक्ष व्हावी असी मागमी राज्य सरकारने केली. त्यामुळे पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होईल असे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. मराठा विद्यार्थ्यांचा आज भ्रमनिरास झाला, असं विनोद पाटील म्हणाले.