Aurangabad: औरंगाबाद येथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच तरूणाने विहिरीत घेतली उडी, उपचारादरम्यान मृत्यू
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून येत आहेत. एवढेच नव्हेतर, महाराष्ट्रात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्याही जास्त आहे.
भारतात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून येत आहेत. एवढेच नव्हेतर, महाराष्ट्रात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याचदरम्यान, कोरोनाची लक्षणे झाल्याची समजताच एका तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथील उमरगा (Omerga) तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूण हा आजारी असल्यामुळे त्याच्या मोठ्या भावाने त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. यावेळी डॉक्टरांनी त्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचे सांगून मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर मोठ्या भावाने त्याला घरी नेले. परंतु, कोरोनाचा संसर्गाच्या भितीने तो नैराश्यात गेला. ज्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कुटुंबातील सर्वजण शेताकडे गेले असताना त्याने विहिरीवरील लाईट बॉक्समध्ये हात घातला. परंतु, तो सुदैवाने बचावला. त्यानंतर त्याने कोरड्या विहिरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. विहिरीत झाडेझुडपे असल्याने तो मध्येच जाळीमध्ये अडकला. हे स्थानिकांनी पाहताच आजूबाजुच्या लोकांना जमा केले. त्यानंतर नागरिकांनी तरूणाला विहिरीबाहेर काढले. तसेच जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- नजिकची स्मशानभूमी शोधण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून ऑनलाइन पोर्टल सुरू
कोरोनाच्या भितीपोटी आत्महत्या केल्याची ही पहिली घटना नाही. राज्यात कोरोनाच्या भितीमुळे याआधी अनेकांनी आपले जीवन संपवले आहे. परंतु, प्रचंड रुग्णांनी कोरोनावर मात केली असतानाही भितीपोटी अनेकांनी आपले जीवन संपवले आहे. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे. महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भात माहिती दिली आहे.