Wooden Gallery Collapse In Vasai: वसईत खो-खो सामन्यादरम्यान लाकडी गॅलरी कोसळली; 15 जण जखमी

लाकडी गॅलरीत उभे असलेले प्रेक्षक उत्साहाने उड्या मारू लागले. गर्दीमुळे गॅलरीचा काही भाग कोसळला. जवळपास 15 तरुण मुलं-मुली, आपल्या टीमचा जयजयकार करत गॅलरीतून कोसळले.

Wooden Gallery Collapse प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - X/@ArtRiposte)

Wooden Gallery Collapse In Vasai: वसईत (Vasai) शुक्रवारी संध्याकाळी खो-खोच्या सामन्यादरम्यान (Kho-Kho Match) मैदानावर उभारलेली तात्पुरती लाकडी गॅलरी (Wooden Gallery) कोसळली. या घटनेत 15 जणांना किरकोळ दुखापत झाली. जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश प्रेक्षक तसेच तरुणांचा समावेश आहे. वसईतील चिमाजी आप्पा मैदानावर ही घटना घडली. येथे 27 ते 31 डिसेंबर दरम्यान वसई तालुका कला क्रीडा महोत्सव सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास खो-खोचा सामना सुरू झाला. लाकडी गॅलरीत उभे असलेले प्रेक्षक उत्साहाने उड्या मारू लागले. गर्दीमुळे गॅलरीचा काही भाग कोसळला. जवळपास 15 तरुण मुलं-मुली, आपल्या टीमचा जयजयकार करत गॅलरीतून कोसळले. सुदैवाने त्यांना किरकोळ जखमा झाल्या. जखमींवर वसईतील नागरी डीएम पेटिट रुग्णालयात उपचार करण्यात आले. (हेही वाचा -Newly Married Woman Died At Prabalgad Fort: सेल्फीचा मोह पडला महागात! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू)

दरम्यान, विरार येथील यंग स्टार ट्रस्टतर्फे दरवर्षी बहुसांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतात. तथापी, कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, या घटनेनंतर विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरळीत पार पडले. तसेच पुढील स्पर्धा वेळापत्रकानुसार समाप्त होतील. (हेही वाचा -Drunk Woman Assaulting Cop Video: मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेचा पोलिसांवर आणि स्थानिकांवर हल्ला, पाहा व्हिडिओ)

तथापी, 2022 मध्ये केरळमध्ये मलप्पुरममधील वंदूर येथे फुटबॉल सामन्यादरम्यान तात्पुरती गॅलरी कोसळल्याने अनेक जण जखमी झाले होते. फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी याठिकाणी 5 हजार पेक्षा जास्त प्रेक्षक जमले होते. मात्र, अचानक गॅलरी कोसळल्याने अनेकजण जखमी झाले. जखमींना परिसरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif