Pune: पिस्तुलाच्या धाकाने नराधमाचा महिलेवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून सतत अत्याचार, पुणे येथील घटना
एवढेच नव्हेतर, या घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune) तळेगावात (Talegaon) ही घटना घडली आहे.
पिस्तुलाचा धाक दाखवत एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) केला. एवढेच नव्हेतर, या घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune) तळेगावात (Talegaon) ही घटना घडली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी (Talegaon Police) मुख्य आरोपीसह अन्य एका जणाला अटक केली आहे. पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपीकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. हे पैसे महिलेने परतही केले आहे. मात्र, व्याजाच्या पैशांच्या बदल्यात आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु, महिलेने नकार दिला. यावर संतापलेल्या आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखल तिच्यावर बलात्कार केला आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडिताने पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी आरोपी किरण घारेकडून एक लाख व्याजाने घेतले होते. दरम्यान, या महिलेने पन्नास हजारांचे दोन धनादेश किरणला दिले होते. परंतु, किरणने व्याजाच्या बदल्यात पीडिताकडे शरिर सुखाची मागणी केली. परंतु, महिलेने नकार दिला. यावर संतापलेल्या किरणने महिलेच्या पतीला आणि मुलाला ठार करण्याची धमकी दिली. तसेच पीडित महिलेला कारमध्ये बसवून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवत पीडितेवर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर, आरोपीने या घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून वारंवार अत्याचार केल्याचे, पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हे देखील वाचा- Malad Crime News: बायको पुन्हा आपल्याकडे परत यावी म्हणून रचला पोटच्या मुलांच्या मृत्यूचा देखावा
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी किरण घारेसह त्याला सहकार्य करणाऱ्या दिपक ओसवालाही तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पुण्यात हत्या, बलात्कार, विनयभंग, ब्लॅकमेलसारख्या घटना सतत कानावर पडत आहेत. तर, दुसरीकडे पुण्यातील गुन्हेगारी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक प्रयत्न करीत असल्याचे समजत आहे.