Mumbai: मास्क न लावता ऑटोरिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेला थांबवले म्हणून संबधित महिलेकडून बीएमसी कर्मचारी महिलेला मारहाण; पहा व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा गणवेश परिधान केलेल्या महिला कर्मचार्याने ऑटोरिक्षा थांबविली. ज्यामध्ये एक महिला बसली आहे, जिने मास्क घातलेला नाही. व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, बीएमसी कर्मचारी त्या महिलेला मास्क घालायला सांगते. मात्र, ही महिला बीएमसी कर्माचारी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात करते.
Mumbai: मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढत्या घटनांदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला मास्क न वापरल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) महिला कर्मचाऱ्याने थांबवले. मात्र, या महिलेने बीएमसी कर्मचाऱ्याला मारहाण केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला एका ऑटोमध्ये मास्क न लावता बसलेली पाहायला मिळत आहे. यानंतर बीएमसी महिला कर्मचारी या महिलेला मास्क लावण्यासंदर्भात सूचना देत असून दंड वसून करताना दिसत आहे. परंतु, यादरम्यान, मास्क न लावलेल्या महिलेने कर्मचारी महिलेच्या तोंडात मारत मारहाण केली.
ही घटना मुंबईतील कांदिवली रोडची आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा गणवेश परिधान केलेल्या महिला कर्मचार्याने ऑटोरिक्षा थांबविली. ज्यामध्ये एक महिला बसली आहे, जिने मास्क घातलेला नाही. व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, बीएमसी कर्मचारी त्या महिलेला मास्क घालायला सांगते. मात्र, ही महिला बीएमसी कर्माचारी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात करते. त्यानंतर कर्मचारी महिला या स्त्रीला पकडून ठेवते. त्यानंतर या महिलेने स्वत: ला सोडवण्यासाठी कर्मचारी महिलेला मारहाण करते. परंतु, बीएमसी कर्मचारी महिला या महिलेला सोडत नाही. (वाचा- बीएमसी मार्शलवर हल्ला केल्या प्रकरणी एका महिलेविरुद्ध एफआयआर दाखल)
ऑटोरिक्षामधून मास्क न लावता प्रवास करणारी महिला व्हिडिओमध्ये 'तुम्ही मला अडवण्याचे धाडस कसं करता?' 'तू मला स्पर्श का करतेस?' असं ओरडताना ऐकू येत आहे. या घटनेने विचलित झालेले बीएमसी कर्मचारी आसपासच्या लोकांना त्या महिलेस जाऊ देऊ नका, असं सांगताना दिसत आहे. मुंबईतील कोरोना मार्गदर्शक सूचनांनुसार, मास्क न लावलेल्या व्यक्तीकडून 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 25,833 नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही घटना अत्यंत लाजीरवाणी असल्याचं नेटीझन्सकडून म्हटलं जात आहे.