Pune Accident: डुलकी लागताच समोरच्या वाहनाला धडक, अपघातात दोघांचा मृत्यू, पुण्यातील घटना

आयशर टेम्पो चालकाला डुलकी लागताच, समोरून येणाऱ्या मालवाहून वाहनाला जोरदार धडक दिल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.

Accident (PC - File Photo)

Pune Accident: आयशर टेम्पो चालकाला डुलकी लागताच, समोरून येणाऱ्या मालवाहून वाहनाला जोरदार धडक दिल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. या धडकेत भीषण अपघात घडला असून, या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे- मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना घडला. ही घटना पहाटे घडल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.( हेही वाचा- सायन वरून धारावी- वांद्रे ला जोडणारा स्टेशन वरील पूल 20 जानेवारी पासून होणार बंद)

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर वाहन चालकाची पहाटे डुलकी लागली आणि वाहन अनियंत्रित झाले,दरम्यान समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोला धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिल गावित आणि अनिकेत असं या अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. अपघातामुळे वाहतुक सेवा ठप्प झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी खोपोली येथील अपघातग्रस्त टीम आणि दस्तुरी बोरघाट पोलिस दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

अपघातग्रस्त आयशर टेम्पो बाजूला घेण्यात आले आहे. पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सेवा सुरळीत केली. अपघातात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली.  वाहनाचा वेग आधिक असल्याने धडक जोरात बसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.अपघातामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे