Sniffer Dog Finds Abducted Boy: मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोध पथकातील स्निफर कुत्र्याची कमाल! अवघ्या 90 मिनिटांत घेतला अपहरण केलेल्या 6 वर्षीय मुलाचा शोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला होता.

Dog | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Sniffer Dog Finds Abducted Boy: कुत्रा हा माणसांचा एक उत्तम संरक्षक आहे. आतापर्यंत तुम्ही कुत्राने केलेल्या आश्चर्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मुंबईतील नुकत्याच घडलेल्या एका घटनेने ते पुन्हा बरोबर सिद्ध झाले आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) बॉम्ब शोधक पथकाच्या (Bomb Squad) एका स्निफर कुत्र्याने (Sniffer Dog) अपहरण केलेल्या सहा वर्षाच्या मुलाचा अवघ्या 90 मिनिटांत शोध घेतला.

लिओ नावाच्या कुत्र्याला शहरातील उपनगरीय अंधेरी (पूर्व) भागातील अशोक नगर झोपडपट्टीत अपहरण झालेला मुलगा त्याच्या घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला होता. (हेही वाचा -नाशिक पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकात 11 वर्षांच्या सेवेनंतर निरोपाच्या क्षणी Sniffer Dog भावूक; पहा Video)

दरम्यान, बराच वेळ तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आणि शोधाशोध सुरू केली. परंतु त्यांना तो सापडला नाही, त्यानंतर त्यांनी मुलाच्या शोधात मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. (हेही वाचा - Operation Dosti: भारतीय NDRF च्या श्वानपथकातील  Romeo आणि Julie ची कौतुकास्पद कामगिरी; भूकंपग्रस्त टर्कीत 6 वर्षीय मुलीला शोधून वाचवण्यात बजावली मोलाची भूमिका)

घराबाहेर खेळायला जाण्यापूर्वी मुलाने कपडे बदलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लिओला आणले आणि त्याला मुलाचा टी-शर्ट शिवण्यासाठी दिला. मुलाचा टी-शर्टचा वास घेतल्यानंतर लिओने त्याचा शोध सुरू केला. लिओने मुलाला जवळच्या इमारतीत शोधून काढले. याप्रकरणी अज्ञात अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.