Beed Crime: गर्भवती महिलेला दोन लाख रुपयांसाठी मारहाण, पीडितेचा गर्भपात, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल
दरम्यान बीड जिल्ह्यात सासरच्या मंडळीकडून एका गर्भवती महिलेला मारहाणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Beed Crime: कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक घटना रोज घडत असतात. दरम्यान बीड जिल्ह्यात सासरच्या मंडळीकडून एका गर्भवती महिलेला मारहाणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन लाख रुपयांसाठी मारहाण करून, पोटावर लाथ मारल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा गर्भपात देखील झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहर हाजरले आहे. ही घटना बीड जिल्ह्यात बालपीर भागात घडली आहे. (हेही वाचा- शेततळात बुडून दोघांचा मृत्यू, )
मिळालेल्या माहितीनुसार, साबिया इरफान शेख असं पीडितेचे नाव आहे. साबियाने मारहाण प्रकरणा बीड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला.या प्रकरणी सासू, पती आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहारतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हे प्रकरण नोंदवले गेले आहे. साबियाला २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पतीने मारहाण केली होती. लाथा बुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपने तिच्या हाता- पायावर पाठीवर मारले. ऐवढेच नाही तर सासूने जमिनीवर पाडून डोक्यावर, पाठीवर, पोटावर लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत साबिना गंभीर जखमी झाली होती.
पोटात लाथ लागल्यामुळे महिलेचा गर्भपात देखील झाला. या घटनेनंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. पोलिसांनी पीडिती महिलेच्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल केला. आरोपी पती इरफान बाबू शेख, सासू शकिला बाबू शेख व दीर आमेर बाबू शेख या सर्वांवर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम प्रमाणे कलम 316, 323, 324, 504, 506, 498 (अ), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.