पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल

तत्पूर्वी या प्रकरणाचा तपास पोलिसांनी CID कडे सोपविला आहे. तर CID यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Bombay High Court | (Photo Credits-ANI)

पालघर जिल्ह्यात गेल्या आठड्यात मॉब लिंचिंगचा संतापजन प्रकार घडल्याचा दिसून आले. यामध्ये 2 साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे नागरिकांकडून या प्रकरणाचा निषेध करण्यात आला होता. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार अमानवीय आणि धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले होते. पालघर जिल्ह्यातील प्रकरणासंदर्भात 110 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी आता पालघर  (Palghar) मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यासंदर्भात बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तत्पूर्वी या प्रकरणाचा तपास पोलिसांनी  CID कडे सोपविला आहे. तर CID यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

पालघर येथे एका गाडीतून दोन साधू आणि त्यांचा ड्राइव्हर प्रवास करत होते. त्यावेळी दाभाडी-खानवेल रोडवर तब्बल 200 आदिवसांच्या जमावाने वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले. त्यानंतर जमावाने तिघांची चौकशी न करता मारहाण आणि दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मृत्यू झाला. तर मृत्यू पावलेल्या व्यक्तींमध्ये सुशीलगिरी महाराज (वय 30), चिकणे महाराज कल्पवृक्ष गिरी (वय 70) आणि त्यांचा चालक निलेश तेलवडे (वय 30) यांचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पालघर मधील घटनेतील आरोपींना शक्य तितकी कठोर शिक्षा होईल असे स्पष्ट केले आहे. (Palghar Lynching: पालघर येथे जूना आखाड्यातील दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणी, BJP कडून उच्च स्थरीय चौकशीची मागणी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान,  या प्रकरणातील पळ काढलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणामागे कोणतेही धार्मिक कारण नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. तसेच भाजपने सुद्धा पालघर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.