Coronavirus: पुण्यात अग्निशमन दलाच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण

पुण्यात एका अग्निशमन दलाच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे.

Fire Brigade employees | Representational Image (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत असून या कोरोनाच्या विळख्यात अहोरात्र कार्यरत असलेले कोविड योद्धा देखील अडकत चालले आहेत. यात पोलिस, डॉक्टर यांना कोरोनाची लागण होत आहेत. त्याचबरोबर नवीन आलेल्या माहितीनुसार पुण्यात एका अग्निशमन दलाच्या ड्रायव्हरला (Fire Bridge Driver) कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. ही खूपच धक्कादायक घटना असून या वाहनचालकाच्या संपर्कात कोण कोण आले याची आम्ही माहिती घेत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात सद्य स्थितीत 17,974 कोरोना बाधित रुग्ण असून एकूण 694 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तसेच काल दिवसभरात 1216 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यासोबत 207 नवे रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत 3301 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. BMC मध्ये Social Distancing साठी कर्मचा-यांची उपस्थिती 100% वरुन 75 टक्क्यावर आणण्याचा महापालिकेचा निर्णय

सद्य स्थितीत भारतात एकूण 56,342 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून मृतांची एकूण संख्या 1886 वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 17 मे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.