IPL Auction 2025 Live

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: पक्ष सोडून गेलेली व्यक्ती 'शिवसेनेचा मुख्यमंत्री' होऊ शकत नाही; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

सेनेला बाजूला सारलेल्या व्यक्तीला 'शिवसैनिक' मुख्यमंत्री म्हणता येणार नाही, असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्ष सोडून गेलेली व्यक्ती 'शिवसेनेचा मुख्यमंत्री' (Shiv Sena CM) होऊ शकत नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

एक 'शिवसैनिक' अखेर राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या विधानांची निंदा करत ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. सेनेला बाजूला सारलेल्या व्यक्तीला 'शिवसैनिक' मुख्यमंत्री म्हणता येणार नाही, असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवीन सत्ताधारी युतीचा वाद ठामपणे फेटाळून लावला. (हेही वाचा - Raj Thackeray on Devendra Fadnavis: 'धनुष्यातून मागे ओढलेल्या दोरीला कोणी माघार म्हणत नाही', राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने)

दरम्यान, गुरुवारी उशिरा 40 आमदारांच्या शिंदे गटाने ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केल्यामुळे 56 वर्षे जुना पक्ष आणि त्याच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता असताना शिवसेनाप्रमुखांच्या विधानांना महत्त्व आहे.

यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, असे मी म्हणत होतो. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि विधानसभेच्या आधी 'मातोश्री'वर हे ठरलं होतं. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपला शब्द पाळला असता आणि मुख्यमंत्री पद वाटून घेतले असते, तर गेल्या काही दिवसांत जे काही घडले ते सन्मानाने घडू शकले असते, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

तथापी, 2019 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि भाजप युतीचा पुनरुच्चार करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा यांनी प्रत्येकी 30 महिन्यांसाठी मुख्यमंत्री पद सामायिक करण्याचा प्रस्ताव फेटाळला. आता अडीच वर्षांचा कालावधी संपला आहे. त्यांनी वचनबद्धतेचा आदर केला असता, तर मला मुख्यमंत्री होण्याची गरजचं नव्हती. परिणामी महाविकास आघाडीही अस्तित्वात आली नसती. शिवसेना भवनात पत्रकारांशी झालेल्या संक्षिप्त संवादात ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.