Mumbai News: CISF जवानाला प्रवाशाकडून मारहाण, आरोपी सहार पोलीस कोठडीत

केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या जवानाला तरुण प्रवाशांने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

 Mumbai News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाला तरुण प्रवाशांने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलींसाच्या ताब्यात असल्याचे समोर आले आहे. आरोपी एका अज्ञात स्त्रीची छेड काढत होता.दरम्यान जवानाला हे समजताच, आरोपीकडे विनाकारण छेड काढल्याप्रकरणी विचारणा केली. दरम्यान जवानाला आरोपीने विमानतळावरच मारहाण केली. या घटनेमुळे विमानतळावर अर्धातास गोंधळ निर्माण झाला.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर एक अज्ञात व्यक्ती महिलेला विनाकारण छेडत होता. महिलेने त्रासाला कंटाळून कर्तव्यावर असलेल्या जवानाला कळवले. जवानाने आरोपीला महिलेला त्रास दिल्या प्रकरणी विचारणा केली असताना आरोपीने जवानासोबत भांडण सुरू केले. जवनाने आरोपीकडून पासपोर्टची चौकशी केली. दरम्याना आरोपीने जवानाला उद्धटपणे उत्तर दिली. वादविवादात आरोपीने जवानाला तीन ते चार वेळा काना खाली मारली. जवानाने  कामावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना कळवले.

सहाकार्याच्या मदतीने जवानाने आरोपीला  सीआयएसएफ नियंत्रण कक्षाकडे नेले. तेथे तपासणी केल्यावर  आरोपीचे नाव संदीप सिंह असल्याचे समोर आले. तो उत्तराखंड येथील रहिवासी असून तो लेहला जात असल्याचे माहिती मिळाली.  त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.