Nalasopara Minor Girl Rape Case: नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला वाराणसीतून अटक
मुलगी एकटी असल्याचे पाहून त्या व्यक्तीने पीडितेला फोन केला आणि तिची आई तिला बोलावत असल्याचे खोटे सांगितले.
Nalasopara Minor Girl Rape Case: तुळींज येथे 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या नालासोपारा (Nalasopara) अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील (Minor Girl Rape Case) आरोपीला मीरा-भाईंदर पोलिसांच्या (Mira-Bhayandar Police) पथकाने शनिवारी (25 नोव्हेंबर) अटक केली. आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी सोमवारी आरोपीला तुळींज पोलिस ठाण्यात आणले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी 14 नोव्हेंबर रोजी साखर खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मुलगी एकटी असल्याचे पाहून त्या व्यक्तीने पीडितेला फोन केला आणि तिची आई तिला बोलावत असल्याचे खोटे सांगितले. मुलगी आरोपीवर विश्वास ठेवून त्याच्याकडे गेली असता त्याने तिला एका निर्जनस्थळी नेले. आरोपीने तेथे मुलीवर लैंगिक अत्याचार करून तेथून पळ काढला. (हेही वाचा -Madhya Pradesh Shocker: ग्वाल्हेरमध्ये 17 वर्षीय तरुणीचे फेसबुक फ्रेंडकडून अपहरण; पीडितेवर सामूहिक बलात्कार, आरोपीला अटक)
मुलीने घरी परतल्यानंतर हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत तीन पथके तयार केली. 23 वर्षीय आरोपीचा यूपीमधील वाराणसी येथे शोध लागला असून पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक करून आता नालासोपारा येथील तुलिंज येथे आणले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात चेंबूरमधील पोस्टल कॉलनी येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) येथील एका फ्लॅटमध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15-16 नोव्हेंबरच्या रात्री घडली.