मुंबई: COVID-19 वरील 32,000 रुपयाचे इंजेक्शन 1 लाख किंमतीला विकणा-या 30 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी केले गजाआड
COVID-19 वरील 32,000 रुपयाचे इंजेक्शन 1 लाख किंमतीला विकणा-या 30 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच कोरोनाला देशातून हद्दपार करणारी लस लवकरात लवकर देशात आणण्यासाठी डॉक्टर्स, वैज्ञानिक, संशोधक युद्ध पताळीवर प्रयत्न करत आहेत. यामुळे कोविड-19 (COVID-19) वरचे 32,000 रुपये किंमतीचे इंजकेशन 1,00,000 लाखाला विकून लोकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करणा-या 30 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.
उत्तराखंड (Uttarakhand) वरुन आलेल्या या 30 वर्षीय अझम नासीर खान या आरोपीने लॉकडाऊनमुळे सॅनिटायजर (Sanitizer) आणि मास्क (Mask) विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला नवी दिल्लीतील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाने महाराष्ट्रात हे इंजेक्शन विकताना त्यावर 10,000 कमी करुन विकावे असे सांगितले होते. कारण महाराष्ट्रात याला जास्त डिमांड आहे. मात्र या आरोपीने हे 32,000 रुपयाचे इंजेक्शन 1,00,000 ला विकण्यास सुरुवात केली. मुंबई पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून अझमला अटक केली.
अझम कडून या इंजेक्शनचे 15 बॉक्सेस जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. उल्हासनगर येथून Tocilizumab इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या निवृत्त शिक्षिकेला अटक
काही दिवसांपूर्वी उल्हासनगर येथून अन्न व औषध प्रशासनाने कल्याण गुन्हे शाखेच्या मदतीने एका 56 वर्षीय निवृत्त शिक्षिकेला अटक केली. सदर महिला कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी लागणाऱ्या Tocilizumab या औषधाचा काळाबाजार करत असल्याची घटना समोर आली आहे. निता पंजावनी असे निवृत्त शिक्षिकेचे नाव आहे. ती उल्हासनगर मधील मनिषा नगर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मनिषा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर असे समोर आले की, त्यांच्याकडे 1 Tocilizumab इंजेक्शन असून त्याची मूळ किंमत 40,545 रुपये असून ते तब्बल 60 हजार रुपयांना विक्री केली जात होती.