Jalgaon: झोक्यावर बसून अभ्यास करणं 14 वर्षांच्या चिमुरड्याला पडलं माहागात; झोका खेळतांना लागला गळफास
रविवारी रात्री वेदांतवर अत्यंसंस्कार करण्यात आले.
Jalgaon: जळगाव जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातील मुंदडा नगरातील एका 14 वर्षीय मुलाला झोका खेळतांना आपला जीव गमवावा लागला आहे. झोक्यावर बसून अभ्यास करताना अचानक गळफास लागल्याने या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. वेदांत संदीप पाटील असं या मुलाचं नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वेदांत रविवारी घरी वरच्या मजल्यावर झोक्यावर बसून अभ्यास करत होता. अभ्यास करताना झोक्याच्या दोरीचा गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच पाटील परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा -Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या सुटकेला काँग्रेसचा आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार पुनर्विचार याचिका)
वेदांत हा शहरातील मुंदडा ग्लोबल स्कुलचा नववीचा विद्यार्थी होता. वेदांत याचे आई-वडिल दोन्ही शिक्षक आहेत. विशेष बाब म्हणजे वेदांत हा काही दिवसांपूर्वी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा मुलगा होता. वेदांतचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रविवारी रात्री वेदांतवर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.