वर्धा: Coronavirus Lockdown नियमांचं उल्लंघन करत धान्य वाटप केल्याप्रकरणी दादाराव केचे यांच्या विरोधात FIR; 'शेकडोंची गर्दी हे विरोधकांचं कारस्थान' आमदाराचा दावा

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी FIR देखील नोंदवला आहे.

Hundreds of people gather outside Dadarao Keche House | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई दिवसेंदिवस अटीतटीची होत असताना वर्धा येथील आमदाराच्या घराजवळच संचारबंदीच्या नियमांचे तीन - तेरा वाजल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान काल (5 एप्रिल) आरवी येथील आमदार दादाराव केचे  (BJP MLA Dadarao Keche) यांनी वाढदिवसानिमित्त रेशनवाटप केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी FIR देखील नोंदवला आहे. आमदार दादाराव खेचे यांनी रविवारी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत राहत्या घरी त्यांनी गोर गरिबांना गहु, तांदुळ वाटले. यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं चित्रदेखील पहायला मिळालं होतं. सध्या जगभरातून तज्ञ, डॉक्टर मंडळी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळा, घरामध्येच राहा असं आवाहन वारंवार करत आहेत.

आमदार दादाराव केचे  यांच्या घराबाहेर रेशन घेण्यासाठी चिंचोळ्या भागामध्ये शेकडो नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करून नागरिकांना हटकले. सध्या सोशल मीडीयावर या घटनेचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. India Today TV सोबत बोलताना दादाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना केवळ 21 जणांना धान्यवाटप करायचं होतं मात्र विरोधकांनी डाव साधून शेकडो लोकांची गर्दी घराजवळ पाठवल्याचा त्यांनी आरोप केला आहे. COVID 19: देशातील कोरोना च्या मृतांचा आकडा पोहचला शंभरी पार; रुग्णांची संख्या 4000 वर

ANI Tweet

भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यामध्येही महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि काळजीचं वातावरण आहे. अशामध्ये सरकारकडून सार्वाजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात 21 विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना पसरला असून 748 एकूण रूग्ण आहेत. त्यापैकी 45 जणांचा मृत्यू झाला असून 56 रूग्ण कोरोनामुक्तदेखील झाले आहेत.