Landslide In Shahapur: शहापूरमध्ये दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाकडून करण्यात आली बसेसची व्यवस्था
सध्या मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली असून, प्रवाशांच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुढील प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. देवलाली रेल्वे स्थानकावर सेवाग्राम एक्स्प्रेस बंद करण्यात आली असून मुंबईच्या दिशेने प्रवाशांची ने-आण करण्यासाठी रेल्वेने सुमारे 20 बसेसची व्यवस्था केली आहे.
Landslide In Shahapur: रेल्वेच्या मुंबई विभागातील शाहपूर (Shahapur) विभागातील वासिंद आणि खडवली स्थानकांदरम्यान दरड कोसळल्याने (Landslide) मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या भुसावळ विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या असून काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इटी पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेला बाधित प्रदेशात भूस्खलनाचा इशारा मिळाल्यानंतर, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी गाड्यांना जवळच्या रेल्वे स्थानकावर थांबविण्याचे आदेश देण्यात आले.
सध्या मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली असून, प्रवाशांच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुढील प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. देवलाली रेल्वे स्थानकावर सेवाग्राम एक्स्प्रेस बंद करण्यात आली असून मुंबईच्या दिशेने प्रवाशांची ने-आण करण्यासाठी रेल्वेने सुमारे 20 बसेसची व्यवस्था केली आहे. (हेही वाचा -Ashadhi Wari 2024 Special Trains: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी चालवणार 64 गाड्या; वाचा सविस्तर)
मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्स्प्रेसही इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत तब्बल अकरा गाड्या वळवल्या आहेत. मुंबई विभागातून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या वसई, नंदुरबार ते भुसावळ मार्गे किंवा मनमाड, दौंड, पुणे मार्गे दोन्ही दिशेने वळवण्यात आल्या आहेत. आम्ही रेल्वे स्थानकांवर हेल्प डेस्क उघडले आहेत आणि अगदी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष देखील गरजू प्रवाशांना मदत करत आहेत, असं एका रेल्वे अधिकाऱ्यांने सांगितलं. ट्रेन क्रमांक 12217 केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस पनवेल - कर्जत - कल्याण - वसई आरडी मार्गे वासिंद - खडवली सेक्शन दरम्यान पाणी साचल्याने वळवण्यात आली आहे, असे सीआर विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले.
पुढील गाड्या दिवा-वसई मार्गे वळवण्यात येणार -
12534 सीएसएमटी-लखनौ जंक्शन एक्सप्रेस
12519 LTT - आगरतळा एक्सप्रेस
12336 LTT - भागलपूर
पुढील गाड्या जळगाव-वसई रोड-दिवा मार्गे वळवण्यात येतील
11060 छपरा - LTT एक्स्प्रेस
12294 प्रयागराज -एलटीटी एक्स्प्रेस
12742 पाटणा जंक्शन-वास्को-दा-गामा एक्स्प्रेस
14314 बरेली जंक्शन - LTT एक्स्प्रेस
खालील गाड्या मनमाड-दौंड मार्गे-पुणे मार्गे वळवण्यात येतील
12168 बनारस - LTT एक्स्प्रेस
12142 पाटलीपुत्र जंक्शन - LTT एक्स्प्रेस
12812 हटिया - एलटीटी एक्स्प्रेस
11080 गोरखपूर - LTT
खालील ट्रेन रद्द करण्यात आली आहे -
गाडी क्र. 11119 इगतपुरी-भुसावळ एक्सप्रेस
तथाीप, ट्रेन क्रमांक 19578 जामनगर ते तिरुनेलवेली एक्स्प्रेस गाडी कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा जंक्शन - मडगाव मार्गे वासिंद - खडवली सेक्शन दरम्यान पाणी साचल्याने वळवण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)