Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी इमारतीला आग
अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोली (Airoli) येथील सेक्टर 19 येथील रहिवाशी इमारतीला आज (30 एप्रिल) संध्याकाळी आग लागली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. धुराच्या लोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून अद्याप या संदर्भातील अधिक माहिती हाती आलेली नाही.
ANI ट्विट:
काल मुंबईत दोन ठिकाणी आगीच्या दोन घटना घडल्या. प्रथम माटुंगा येथील बिग बाजारला आग लागल्यानंंतर संध्याकाळी माहिम येथील दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली. या दोन्हीही घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.