Buldhana Shocker: बुलढाण्यात लाजिरवाणा प्रकार, डॉक्टर तरुणीवर तीन लोकांनी केला हल्ला, तीघांवर गुन्हा दाखल
अमरावती येथील डॉक्टर तरुणींवर तीघांनी हल्ला केला आहे.
Buldhana Shocker: बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टर तरुणीचा विनयभंग करत तीची धिंड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अमरावती येथील डॉक्टर तरुणी ही बारलिंगा गावात गेली होती. गावात गेल्यानंतर ती एका घरात गेली. घरात गेल्यानंतर तीला घरातल्या व्यक्तीने मारहाण केली. जबर मारहाण केल्याने तीला जखमा झाल्या आहे. तिचे अंगावरील कपडे फाडले. मारहाण केल्यानंतर तीची धींड काढण्याचा प्रयत्न केला आहे. गावकरांनी त्या मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका केली. तिला अंधेरा पोलीस ठाण्यात तीला पोहचवले.
या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तरुणी बुलढाण्यातील बारलिंगा या छोट्याशा गावातील एका घरात गेली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळानंतर सदर घरातील लोकांनी तीला मारहाण केली. मारहाणीत तीचे अंगावरील कपडे देखील फाडण्याचा प्रयत्न केला. तीची धिंड काढण्याच्या प्रयत्नात होते. दोन पुरुषांनी आणि एका महिलेने हा हल्ला केला आहे. ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात येताच पीडित मुलीची सुटका केली. तीला ताबडतोब पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, अमरावती येथील डॉक्टर असलेली ही तरुणी बारलिंगा या गावात का आली, ती आरोपींच्या घरी का गेली? तसेच तिला मारहाण का करण्यात आली याची प्रश्न उत्तरे अद्यापही समोर आले नाही. दरम्यान, या बाबत पोलिसांना प्रसार माध्यमांनी या घटनेची विचारणा केली असताना, त्यांनी देखील उत्तरे दिली नाहीत.