दोन्ही हात नाहीत तरी 'या' शेतकऱ्याने केले मतदान; पायावर लावून घेतली शाई (See Photo)
त्यात अजून एक थक्क करणारी बाब म्हणजे दोन्ही हात नसलेल्या शेतकऱ्याने केलेले मतदान.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभर मतदान होत आहे. मतदानाचा अवधी संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 17.79 टक्के मतदान पार पडले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे ग्रामीण भागात मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे पण शहरी भागात मात्र नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. त्यात अजून एक थक्क करणारी बाब म्हणजे दोन्ही हात नसलेल्या शेतकऱ्याने केलेले मतदान.
नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे बाजीराव मोजाड या शेतकऱ्याने मतदान केलं आहे. 2008 साली शेतात राबताना एका अपघातात त्यांनी दोन्ही हात गमावले होते. आणि आज मतदान करताना दोन्ही हात नसल्याने बाजीराव यांच्या पायाला शाई लावण्यात आली आहे.
ABP माझा या वाहिनीने बाजीराव यांचा मतदानाला जातानाचा फोटो ट्विट केला आहे.
पाहा फोटो,
राज्यभरातून ज्येष्ठ नागरिक मंडळी तसेच अनेक आजारांशी लढा देणाऱ्या व्यक्ती मतदानाचा हक्क बजावताना दिसल्या. यावरून तरुण मंडळींनी जबाबदारीची जाणीव काय असते हे त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे.