Mumbai Crime: सोसायटीच्या बैठकीत राडा, रागाच्या भरात अध्यक्षने सदस्याच्या अंगठाच्या घेतला चावा, गुन्हा दाखल
या घटनेत तरुणाला आपला डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. सोसायटीच्या अध्यक्षासोबत बाचाबाची झाल्याचे समोर येत आहे.
Mumbai Crime: मुंबईतील दहिसर येथील सोसायटीच्या बैठकीत एका सदस्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तरुणाला आपला डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. सोसायटीच्या अध्यक्षासोबत बाचाबाची झाल्याचे समोर येत आहे. या घटनेत आणखी एकाला दुखापत झाली. या प्रकरणी हल्ला झालेल्या तरुणांनी MHB पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (हेही वाचा- गोरेगाव मध्ये 58 वर्षीय व्यक्तीचा घराबाहेर सापडला मृतदेह; पत्नीची देखील घरात गळा दाबून हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य देसाई असं पीडित तरुणाचे नाव आहे. दहिसर पश्चिम येथील म्हात्रे वाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. रविवारी सकाळी सोसायटीने एक बैठक घेतली. नित्यानंद परिहार हे सोसायटीचे अध्यक्ष आहेत. बैठकीत अध्यक्ष परिहार आणि आदित्य देसाई यांच्यात काही मुद्द्यावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, नित्यानंद परिहारने देसाई यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा चावून जखमी केला.
नित्यानंद यांनी जाणूनबूजून हल्ला केला आणि अंगठा चावला असा आरोप देसाई यांनी केला. या घटनेनंतर सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. अंगठा चावल्यानंतर ते जखमी झाले. त्यानी तात्काळ रुग्णालयात गाठले. तेथे उपचार करण्यात आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पुढील तपास सुरु केला आहे.