Mumbai Bribe Case: 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मांटूगा पोलिस निरिक्षकांसह एकावर गुन्हा दाखल

जामनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) माटुंगा पोलिस ठाण्यातील एका निरीक्षकावर आणि एका व्यक्तीवर 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Bribe | (File Image)

Mumbai Bribe Case: गुजरातमधील (Gujarat) जामनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) माटुंगा पोलिस ठाण्यातील एका निरीक्षकावर आणि एका व्यक्तीवर 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माटुंगा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात फिर्यादीला अटक न करण्याच्या बदल्यात पोलिसांनी पैसे मागितल्याची माहिती आहे. (हेही वाचा-  चेंबूर येथे लाच घेताना रंगेहात पकडलं, तीन पोलिसांवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्पेक्टर दिगंबर पगार यांनी तक्रारदाराला राजकोट येथून गुन्ह्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली होती. गुप्त माहितीनुसार,पोलिसांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला.  त्याने पगार यांना वैयक्तिकरित्या ओळखत असल्याचे सांगितले आणि प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाख रुपये देण्यास सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी पथक नेमले.

शुक्रवारी या व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पगार यांना फोन करून 10 लाख रुपयांची लाचेची रक्कम मिळाल्याची माहिती दिली असता जेमन सावलियाला यांना रंगेहात पकडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. परंतु अद्याप कोणालाही अटक केले नाही.  मुंबईच्या माटुंगा पोलिस ठाण्यातील निरीक्षक दिगंबर पगार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला, असे एसीबीने सांगितले.