New Mumbai: प्रशिक्षणादरम्यान महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉग ट्रेनरवर गुन्हा दाखल

रबाळे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी 20 वर्षीय पीडितेच्या घरी तिच्या कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी जात असे.

Molestation | (Photo Credits: Archived, edited)

New Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी 30 वर्षीय डॉग ट्रेनरवर (Dog Trainer) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. रबाळे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी 20 वर्षीय पीडितेच्या घरी तिच्या कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी जात असे.

आरोपीने पीडितेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने महिलेला अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केला. तसेच पीडितेने या गुन्ह्याची माहिती कोणाला दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. (हेही वाचा - Pune Crime: पुण्यातील मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागावरुन धारदार शस्त्राने वेटरवर हल्ला)

तक्रारीच्या आधारे, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.