Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का; माजी आमदार राजन तेलींचा भाजपला रामराम! आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थित करणार पक्षप्रवेश

तेली यांनी म्हटलं आहे की, त्यांनी गेल्या 10 वर्षात भाजपसाठी खूप कष्ट केले, मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Rajan Teli (फोटो सौजन्य - फेसबुक)

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर करत आहेत. दरम्यान, अशातचं आता भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. कारण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते राजन तेली (Rajan Teli) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजन तेली लवकरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UTB) मध्ये सामील होणार आहेत.

नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाढल्या राजन तेली यांच्या अडचणी -

राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी होते. तेली यांनी म्हटलं आहे की, त्यांनी गेल्या 10 वर्षात भाजपसाठी खूप कष्ट केले, मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा -Laxman Dhobale: अजित पवार यांच्याकडून त्रास, लक्ष्मण ढोबळे भाजप सोडणार; महायुतीला धक्का)

दरम्यान, नारायण राणेंचा मुलगा नीलेश हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत तेली यांनी सांगितलं की, ते एकाच कुटुंबातील सदस्यांना लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याच्या विरोधात आहे. मी घराणेशाहीचा स्वीकार करत नाही. राणे कुटुंबियांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे आपण भाजप सोडत असल्याचा दावा तेली यांनी केला आहे. (हेही वाचा, Pune: पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; Deepak Mankar यांना आमदारकी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 600 हून अधिक कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा)

नारायण राणे यांचा धाकटा मुलगा नितेश हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आमदार आहेत. तेथून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वृत्तानुसार, शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जागेवरून निलेश यांना उमेदवारी दिली जाणार आहे. राजन तेली हे पूर्वी अविभाजित शिवसेनेचे सदस्य होते. तथापी, राजन तेली यांनी राजीनामा देताना कारणे सांगितली आहेत. तेली यांचे राजीनामा पत्र सध्या सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. या राजीनामा पत्रात राजन तेली यांनी राणे कुटुंबियांवर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 75 जागा कोकण विभागात आहेत, ज्यात मुंबईतील 36 जागा आहेत.