Coronavirus: पुण्यात 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू; जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा 5 वर

त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा 5 वर पोहचला आहे. आज सकाळी औंध रुग्णालयात एका 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यामुळे तिला गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या महिलेला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पुणे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नंदापूरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

Coronavirus: पुण्यात (Pune) 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा 5 वर पोहचला आहे. आज सकाळी औंध रुग्णालयात एका 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यामुळे तिला गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या महिलेला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

पुणे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नंदापूरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यात आज 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 661 वर पोहोचला आहे. रविवार दुपारपर्यंत कोरोनाचे 26 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा आकडा 635 वरुन 661 वर पोहोचला आहे. आज पुण्यात 60 वर्षीय महिलेचा आणि 52 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 5 वर पोहोचली आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak in Maharashtra: पुणे येथील ससून रुग्णालयात 2 कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू)

दरम्यान, मुंबईमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या मुंबईत शनिवारी दिवसाअखेरपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा 330 वर पोहोचला होता. तसेच गेल्या 12 तासांत देशात 302 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात कोरोना बाधितांचा आकडा 3 हजार 374 वर पोहोचला आहे.