Mumbai Hoarding Collapsed: होर्डिंग कोसळल्याने 62 वर्षीय व्यक्ती जखमी, मालाड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई येथील मालाड येथे होर्डिंग कोसळल्याने ६२ वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना ५ जून रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी ज्येष्ठ नागरिक महेंद्र कुर्ले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. मालाड येथील जवाहरलाल नेहरू क्रीडा मैदानाबाहेर जय किरण बांधकाम साईटजवळ असताना ही घटना घडली. बीएमसीची नोटीस मिळाल्यानंतर डेव्हलपरने होर्डिंग हटवले आणि बुधवारी संध्याकाळी 6 वाजता एका भिंतीवर लावले.
बुधवारी महेंद्र कुर्ले हे नातवाला घेऊन जाण्यासाठी मैदानावर आले. ते होर्डिंगजवळून जात असताना आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ते त्यांच्या अंगावर पडले. त्याने बाजूला जाण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी मालाड येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली. भारतीय दंड संहिता कलम 336 आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)