Businessman Commits Suicide: मुंबईतील भेंडी बाजार कार्यालयात 52 वर्षीय व्यावसायिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
पोलिसांनी घटनास्थळावरून फाटलेल्या सुसाइड नोटचे तुकडे जप्त केले आहेत, ज्यामध्ये सिवानी यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
Businessman Commits Suicide: मुंबई (Mumbai) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शुक्रवारी रात्री भेंडी बाजार परिसरात (Bhendi Bazar Office) असलेल्या कार्यालयात एका 52 वर्षीय व्यावसायिकाने स्वत:वर पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. इक्बाल मोहम्मद सिवानी असं या व्यावसायिकाचं नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून फाटलेल्या सुसाइड नोटचे तुकडे जप्त केले आहेत, ज्यामध्ये सिवानी यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, इक्बाल सिवानी हा माझगावचा रहिवासी असून तो भेंडीबाजार येथील अमानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आयात-निर्यातीचा व्यवसाय करत होताय सुमारे एक कोटी रुपयांच्या कर्जामुळे त्याच्यावर प्रचंड आर्थिक ताण होता. (हेही वाचा - Ghatkopar Businessman Dies By Suicide: घाटकोपरच्या 56 वर्षीय व्यावसायिकाची वांद्रे-वरळी सी लिंकवर आत्महत्या; मुलासाठी लिहून ठेवली सुसाईड नोट)
सिवानी यांनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते. जेजे मार्ग पोलिसांनी कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांसह सात जणांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीदरम्यान कुटुंबियांनी उघड केले की सिवानी गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्याने त्रस्त होता. कुटुंबियांना आणि त्याच्या मानसिक स्थितीची जाणीव होती. (हेही वाचा - Suicide Attempt In Mantralaya: मंत्रालयात 5 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत केलं रेस्क्यू (Watch Video))
पोलिसांनी या घटनेत वापरलेले शस्त्रही जप्त केले असून सिवानी यांच्याकडे परवाना आहे की नाही? याची पडताळणी करण्यासाठी ते परवाना विभागाकडे पाठवले आहे. जेजे मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला असून सिवानी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.