Mumbai: आजारपणाला कंटाळून 47 वर्षीय महिलेची 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सोलंकी यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Mumbai: भांडुप (Bhandup) च्या पूर्व उपनगरात रविवारी एका 47 वर्षीय महिलेने एका उंच इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित रीना सोलंकी ही गेल्या तीन महिन्यांपासून काही आजारांनी त्रस्त होती. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती, असे भांडुप पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

ही घटना 22 मजली त्रिवेणी संगम हाऊसिंग सोसायटीमध्ये सकाळी घडली. महिलेने खुर्चीवर उभी राहून 18 व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या खिडकीतून उडी मारली. सोलंकी यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्राथमिक माहितीच्या आधारे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे भांडूप परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



संबंधित बातम्या