Thane Shocker: ठाण्यातील उच्चभ्रू इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारून 45 वर्षीय महिलेची आत्महत्या

मात्र, इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच निष्काळजीपणाबद्दल गृहनिर्माण संस्थेवर कारवाई करण्याची मागणीही पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Thane Shocker: ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट (Hiranandani Estate in Thane) येथे गुरुवारी सकाळी 10 वाजता एका 45 वर्षीय महिलेने एका उच्चभ्रू इमारतीच्या 22व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. दिशा धुळधुळे असे पीडित महिलेचे नाव आहे. मात्र, इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच निष्काळजीपणाबद्दल गृहनिर्माण संस्थेवर कारवाई करण्याची मागणीही पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. या व्हिडिओमध्ये महिला तंबाखू चघळत असल्याचे आढळले. त्यानंतर तिने मजल्यावरील आश्रयस्थानात प्रवेश केला आणि इमारतीवरून उडी मारली.

दीक्षा यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी सांगितले की, तिच्या पतीला किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. तसेच मृत महिलेच्या मुलाला डोळ्याची समस्या आहे. ते ठाण्यातील वाघबील परिसरात राहतात. दीक्षा इमारतीतील काही घरात घरकाम करत होती. (हेही वाचा -IIT Student Commits Suicide: IIT दिल्लीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या,पोलिसांकडून तपास सुरु)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताचं स्थानिक मनसे नेते अविनाश जाधव यांनीही घटनास्थळी धाव घेतली. इमारतीतील काही रहिवाशांनी महिला खिडकी साफ करताना पडल्याचा आरोप केला आहे. तसेच काहींनी तिला कोणीतरी ढकलल्याचा दावा केला. सध्या पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत आहेत. (हेही वाचा - Sahil Nandedkar Dies Of Suicide: पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या 17 वर्षीय मुलाने गळफास लावत संपवलं आयुष्य; छत्रपती संभाजीनगर मधील घटना)

कासारवडवली पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी विजय कुमार सैरनाईक यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif