Covid-19: पुणे येथील ससून रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका 34 वर्षीय परिचारिकेला कोरोना विषाणूचा संसर्ग

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे.

Sassoon Hospital (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणूवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ठोस पाऊले उचलताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. देशावर कोरोना विषाणूचे संकट वावरत असताना आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे तोंडभरून कौतूक केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करत असताना अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. यातच पुणे (Pune) येथील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) कार्यरत असलेल्या एका 34 वर्षीय परिचारिकेला (Nurse) कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. या संकटाच्या काळात नागरिकांना उत्यावश्यक सेवा देण्याकरिता डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी ठामपणे उभे आहेत. मात्र, नागरिकांची सेवा करत असताना काही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अनेक संकाटाचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार केला जात आहे. याच रुग्णालयातील एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पुणे शहरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: पुण्यात आज 4 नव्या कोरोना बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 38

एएनआयचे ट्वीट-

भारतात आतापर्यंत एकूण 10 हजार 363 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 339 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 36 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 2 हजार 455 वर पोहचली आहे. यात 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 जण कोरोनामुक्त झाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif