Palghar News: पालघर येथील बॉडी बिल्डर अजिंक्य कदमचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, परिसरात मोठी खळबळ
पालघर येथील बॉडी बिल्डर याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अंजिक्य कदम असे तरुणाचे नाव होते.
Palghar News: पालघर जिल्ह्यातील एका बॉडी बिल्डरचा ह्रदयविकाराच्या (Heartattack) झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.पालघर (Palghar) जिल्ह्यातील नालासोपारा पुर्व मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये परिसरात राहणारा अंजिक्य कदम (Ajinkya Kadam) नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सप्टेबंर ४ रोजी सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटत असल्याची माहिती मिळाली. कुटूंबियांनी त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. आणि काही तासांच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला
सकाळी हातीत दुखत असल्याचे घरांना सांगितले. कुटूंबियांच्या मदतीने त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखी खाली असताना त्याला जोरात ह्रदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घरच्यांना डॉक्टरांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. घरातला मोठा मुलाने अचानक कायमचा सोडून गेल्याने नातेवाईकांवर आणि त्याच्या चाहत्यावर दुखाचे डोंगर कोसळले.
२७ वर्षाच्या अजिंक्यने ७५ किलो वजनात आपल्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक मिळवली होती. या घटनेमुळे पालघर परिसरात मोठी शोककला पसरली आहे. तरुण मंडीळी मध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. ताणतणावाचे प्रमाण देखील वाढत असल्याने तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2023 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

