Woman Commits Suicide In Thane: कोळीवाड्यात 25 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

प्रियंका ठाण्यातील ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. ठाण्यात ती तिचा भाऊ आणि मित्रासोबत राहत होती. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरात एकटी असताना घडली.

Woman Commits Suicide In Thane: कोळीवाड्यात 25 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Woman Commits Suicide In Thane: ठाण्यात एका 25 वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. प्रियंका महाडिक (वय, 25) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रियंका ठाण्यातील ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. ठाण्यात ती तिचा भाऊ आणि मित्रासोबत राहत होती. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरात एकटी असताना घडली.

प्रियंका ठाणे कोपरी येथील चेंदणी-कोळीवाडा चाळीत भाड्याच्या खोलीत राहत होती. प्रियांकाचा भाऊ आणि महिला मित्र ठाण्यात आपापल्या कामासाठी गेले होते. तिचा भाऊ घरी परत आला तेव्हा त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याबाबत माहिती दिली. (हेही वाचा-Boy Commits Suicide In Kalyan: कल्याणमधील 13 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये शिक्षक आणि वर्गमित्रांवर छळ केल्याचा आरोप)

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, आम्हाला रात्री 9.50 वाजता पोलिसांकडून फोन आला. आम्ही अग्निशमन दल आणि बचाव वाहनासह एक पथक रवाना केले. त्यानंतर बचाव पथकाने कुलूप उघडले. कटरचा वापर करून दरवाजा उघडला. यावेळी प्रियंकाने छताच्या लोखंडी रॉडला ओढणीने गळफास लावून घेतला होता.  (हेही वाचा -MBA Student Dies By Suicide: मालाडमध्ये 22 वर्षीय एमबीए विद्यार्थ्याची आत्महत्या; शैक्षणिक दबावामुळे सातव्या मजल्यावरून मारली उडी)

दरम्यान, पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून प्रियंकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. कोपरी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली.

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2024 08:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).