Pune: पुण्यातील बावधन येथे 23 वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; तपास सुरू

शुक्रवारी सकाळी तिच्या आई-वडिलांनी तिला फोनवर फोन केला, मात्र तिने उत्तर दिले नाही.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Pune: पुण्यातील बावधन येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी बावधन (Bavdhan) येथील एका फ्लॅटमध्ये प्रथम वर्ष व्यवस्थापनाला (Management Student) असणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या विद्यार्थिनीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) दिलेल्या माहितीनुसार, नाशिकची राहणारी विद्यार्थिनी नुकतीच फ्लॅटमध्ये राहायला गेली होती. ती या फ्लॅटमध्ये एका वर्गमैत्रिसह राहत होती. या विद्यार्थिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. (हेही वाचा -Mumbai: घर देण्याच्या बहाण्याने कोट्यावधी रुपयांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल)

महाविद्यालयीन विद्यार्थिनी व्यवस्थापनाच्या पहिल्या वर्षात होती. शुक्रवारी सकाळी तिच्या आई-वडिलांनी तिला फोनवर फोन केला, मात्र तिने उत्तर दिले नाही. तिच्या पालकांनी पुण्यातील नातेवाईकांना तिला भेटायला सांगितले. नातेवाइकांनी हाऊसिंग सोसायटीत येऊन दरवाजा ठोठावला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केल्यानंतर ही आत्महत्या असल्याचे घोषित केले.



संबंधित बातम्या