Mumbai News: बॉल पकडण्याच्या नादात जीव गमावला, छतावरून पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

वरळीतील बीडीडी चाळ मैदानावर खेळत असताना बॉल पकडण्याच्या नादात छतावरून पडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Mumbai News:  वरळीतील बीडीडी चाळ मैदानावर खेळत असताना बॉल पकडण्याच्या नादात छतावरून पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुजल मोरे असं पीडितीचे नाव होते. तो दहावीत शिकत होता.खेळत असताना बॉल छतावर गेला होता. बॉल घेण्यासाठी छतावर गेला होता. दरम्यान तोल घसरून मुलगा पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. (हेही वाचा- वादातून कात्र्या पोटात खुपसलेल्या अवस्थेमध्ये सापडला तरूण; विलेपार्लेमधील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सुजल बीडीडी चाळीजवळील एका मैदानात क्रिकेट खेळत होता. खेळता खेळता आंबेडकर भवन येथील इमारतीच्या छतावर चेंड पडला. बॉल आणण्यासाठी छतावर जाण्यासाठी मुलांनी सुजलला वर पाठवले होते. मुलाने वर जाण्यासाठी शिडी वापरली. छतावर चढला. परंतु उतरताना त्याचा पाय केबलमध्ये अडकला आणि तोल गेल्यामुळे तो थेट ३५ फुट खाली पडला.

खाली पडल्याने गंभीर दुखापत झाली. डोक्यातून नाकातून रक्ताच्या थारोळ्या चालू झाल्या. मुलांनी आरडाओरड करत सुजलच्या पालकांना माहिती दिली. त्यांनी लगेच त्याला जवळच्या रुग्णलयात दाखल केले.त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले त्यानंतर एक दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर सुजलच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.